HURRY
ADVANCED EDUCATION SYSTEM BAL-SANSKAR! QUALITY OF EDUCATION. TRUST MIND DEVELOPMENT

आमच्या बद्दल


सन्माननीय पालक ,


सप्रेम नमस्कार ...

                आपली शाळा यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे, उत्तम गुणवत्तेच्या जोरावर  आज शाळेची भरभराट होत आहे, यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांची अपार मेहनत व आपणासारख्या सुज्ञ पालकांचे सहकार्य यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. आपण आपल्या नोकरी व्यवसायामुळे आपल्या परिसराची चौकट सोडून बाहेर जाऊ शकत नाही ,म्हणून बाहेरच्या परिसरातील शैक्षणिक उपक्रमच आपल्या चौकटीत आणून विकास साधावा या मानसिकतेनेच आम्ही पुढचे पाउल उचलीत आहोत , आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो कि, आत्तापर्यंत आमच्या बरोबरीने गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा देण्यास इतर असमर्थ ठरलेले दिसतात .
              आत्तापर्यंत आपल्या पाल्याच्या हितासाठीच आपण निर्णय घेत आलेले आहोत, आणि शिक्षण हा तर आयुष्याचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याबाबतीतील निर्णय घेतांना खूप बारकाईने विचार केला जातो , सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे ,आणि आपल्या शाळेत आम्ही फक्त नैतिकता आणि नेहमी जिंकणेच शिकवीत उद्याच्या पिढीचा उमदा आणि हुशार नागरिक घडवीत आहोत ,

                 शिकवणी अथवा अन्य मार्गांचा वापर करून वेळ व पैशाचा अपव्यय टाळा, “एक ना धड भराभर...” या उक्तीप्रमाणे त्यांचे नुकसान होण्यापेक्षा चांगल्या शाळेत दाखल करून त्यांची प्रगती साधावी व निश्चिंत व्हावे.
आपल्या पाल्याला आमच्या शाळेत दाखल करून त्याच्या उज्ज्वल भवितव्याची कवाडे खुली करा आणि निश्चिंत व्हा !

 आपली                                     

 सौ. अंजली पाटील   

(मुख्याध्यापिका )

_______________________________________________________________



सन्माननीय पालक ,

सप्रेम नमस्कार ...

     आपल्या सारख्या सदहृद्यांच्या मनपूर्वक शुभेच्छामुळे आपली संस्था चढत्या क्रमाने प्रगती चे नवे आलेख निर्माण करीत आहे ,संस्थेची समृध्द शैक्षणिक परंपरा तसेच नाविन्याची कास आणि आपल्या व्यवस्थापनावरील विश्वासाच्या जोरावर
आम्ही नियोजनपूर्वक पावले उचलत आहोत , येत्या काही काळात आपली संस्था नॉलेज हब म्हणून आपणा समोर उभी राहील , खेड्यातून शिक्षणासाठी शहराकडे धावणारी पावले आता स्थिरावली त  व येत्या काही काळात म. गांधीजींच्या विचारानुसार खेड्याकडे चला ह्या संदेशानुसार येत्या काही काळात शहरातील लोक चांगल्या शिक्षणासाठी  खेड्याकडे धाव घेतील व तसे चित्र आजच आपल्या दृष्टीस पडत आहे .            
      माझ्या मुलांच्या शैक्षणिक चिंतेच्या मानसिकतेतूनच या कार्याचा शुभारंभ झाला ,त्यातूनच विद्यार्थांची प्रगती साधण्यासाठी  आमच्याकडे भविष्यापर्यंतचे  नियोजन असून त्यांना आवश्यक तितक्या सोयी -सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे उत्तम करिअर (भविष्य ) घडवू असा विश्वास आपणास देऊ इच्छितो
धन्यवाद



आपला             
श्री . किरण दोधू  शिंदे


(जनरल सेक्रेटरी)